Home शिरूरमहाराष्ट्र अलंकापुरीत रामजन्मोत्सव सोहळ्याची हरिनाम गजरात सांगता

अलंकापुरीत रामजन्मोत्सव सोहळ्याची हरिनाम गजरात सांगता

रामरायांच्या पालखीचे माऊली मंदिरात स्वागत : श्रींची पूजा अनेक कार्यक्रमाचे आयोजन

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी आळंदी येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान ( श्री राम मंदिर) श्रींचे वैभवी मंदिरात श्री रामजन्मोत्सव सोहळ्याची ( सन 2026) विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रींचे पालखीची माऊली मंदिर आणि ग्राम प्रदक्षिणा मिरवणुकीने रामजन्मोत्सव सोहळ्याची सांगता हरिनाम गजरात झाली.तत्पूर्वी श्रींचे जन्मोत्सवा निमित्त ज्ञानेश्वरबुवा कपलाने महाराज यांचे हृदयस्पर्शी वाणीतून सुश्राव्य नारदीय कीर्तन सेवा, श्रींचा अभिषेख, पूजा, वेदमंत्र जय घोष, हरिनाम गजर परंपरेने झाला.जन्मोत्सव होताच श्रींचे मंदिरात पुष्प वर्षाव करत श्रींची मंदिर प्रदक्षिणा झाली. या वेळी मंदिरात भाविकांनी दर्शनास प्रचंड गर्दी केली.भाविकांना श्रींचे दर्शन थेट जागेवर जाऊन देण्यात आले.
भाविकांनी ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांचे नारदीय कीर्तन श्रवणास तसेच श्री रामजन्मोत्सवास मोठी गर्दी केली होती. श्रींचे मंदिरात लक्षवेधी विद्युत रोषणाई, लक्षवेधी विविध रंगी फुलांची पुष्प सजावट, आरास, रंगरंगोटी,ग्रामप्रदक्षिणा मार्गावर रांगोळ्यांचे पायघड्या, बँड, नगारखाना वाजत गाजत सवाद्य ग्रामप्रदक्षिणा आणि श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आळंदी,अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील साधक वारकरी विध्यार्थी यांनी हरिनाम गजर करीत जय श्री राम, जय राम, जय जय राम नामजयघोष करीत ग्राम प्रदक्षिणा करीत सोहळ्याची सांगता श्री राम मंदिरात परंपरेने आरती, प्रसाद वाटपाने झाली.या प्रसंगी शांतता कमेटी सदस्य माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी.भोसले पाटील, संकेत वाघमारे, माउली घुंडरे पाटील, गोविंद ठाकूर तौर, बाबासाहेब भंडारे, दिनेश मावडीकर, विलास वाघमारे, भाऊ पाटील, मंगेश तिताडे, मोहन महाराज शिंदे, माऊली महाराज जाधव, शिवतेज मित्र मंडळ परिवार आदी मान्यवर यांनी उपस्थित होते.
रामजन्मोत्सवात श्रींचे वैभवी श्री राम मंदिरात संगीत, नृत्य गायन सेवा तसेच ज्ञानेश्वर महाराज कपलानेबुवा यांच्या हृदयस्पर्शी वाणीतून नारदिय कीर्तन सेवा, आळंदीकर ग्रामस्थ गावकरी भजनी मंडळ यांची भजन सेवा सोहळ्यात रुजू झाली. आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे वतीने श्री रामजन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यात सुमारे 250 वर मान्यवर पदाधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ गावकरी भजनी मंडळ सेवक, भाविक नागरिक, संगीत साधक, माजी विश्वस्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. श्री रामजन्मोत्सवा निमित्त सकाळी ज्ञानेश्वर महाराज कपलाने बुवा यांच्या हृदयस्पर्शी वाणीतून नारदिय कीर्तन सेवा रुजू झाली. सोहळ्यात वेद पाठशाला आळंदी यांच्या मार्फत रुद्र अभिषेकाचे मंत्र पठण झाले. सोहळ्यात भरतनाट्यम डॉ. परिमल फडके परिमल परफॉर्मिंग आर्ट अँड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सादर झाले. शब्दविणे संवादू भक्ती पूर्व वाद्य संगीत पंडित रमाकांत पराजपे,अभंग वाणी व भावगीत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी ताई रोकडे महाराज, रामकृष्णजी गरड महाराज, मुक्ता कुलकर्णी गरसोळे, रामलीला सई देशपांडे, गजर रामनामाचा नितीन आवेकर, सेक्सोफोन वादन संजय भावे, संतांचिया गावा राग संगीत अभंग अर्पणा केळकर, भक्ती संगीत भज मन राम अमिता घुगरी व तुषार रिठे,भजन राम पर्व ऐक ध्यास हेमंत आठवले, बासरी वादन अमित खरे.अभंग व भक्तीगीत ज्योती गोराणे, श्यामजी गोऱ्हाणे,वारकरी भजन ह.भ.प. आबा महाराज गोडसे, शास्त्रीय वायलिन वादन विद्या इंगळे, रमा चोभे आदींचे संगीत गायन सेवा कार्यक्रम राम मंदिरात झाले. या प्रसंगी आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे मुख्य विश्वस्त राहुल आवेकर, विश्वस्त अविनाश गुळुंजकर, विश्वस्त अर्जुन मेदनकर, लक्ष्मीकांत दंडनाईक, चिन्मय चोभे, रमेश मुसुडगे,माजी विश्वस्त बिपीन चोभे, ओक काका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.भाविकांची श्रींचे जन्मोत्सवास मोठी गर्दी झाली होती.श्रींचे जन्मोत्सव दिनी श्रींचे मंदिरात पूजा, अभिषेक, दर्शन,प्रसाद वाटप,आरती परंपरांचे पालन करीत झाली.आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे प्रमुख विश्वस्त राहुल आवेकर, अर्जुन मेदनकर,चिन्मय चोभे,बिपीन चोभे, रमेश मुसुडगे, लक्ष्मीकांत दंडनाईक, उदय काळे,बाबासाहेब भंडारे, लक्ष्मण मेदनकर, योगेश सुरू, माऊली उर्फ बापू कुऱ्हाडे पाटील, काका ओक, महेश काका अयाचित आदी मान्यवर उपस्थित होते. श्री रामरायांची पालखी मंदिर प्रदक्षिणा पूजन प्रसंगी माऊली देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांचे हस्ते सत्कार करण्यात आले. या प्रसंगी देवस्थानचे पालखी सोहळ्याचे मानकरी, पदाधिकारी उपस्थित होते. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, माजी प्रमुख विश्वस्त व विद्यमान विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, वैजयंता उमरगेकर, सुरेश काका वडगावकर, माजी उपाध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, सागर भोसले,तुकाराम महाराज ताजने, बाळासाहेब महाराज शेवाळे आदींनी सोहळ्यास भेट दिली. आळंदी महाद्वार येथे सकल हिंदू समाज आळंदी पंचक्रोशीचे वतीने श्रींची पूजा, पाळणा, आरती भव्य मिरवणूक उत्साहात झाली. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मछिंद्र शेंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आळंदीतील विविध कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात परंपरेने शांततेत साजरे झाले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?