Home पिंपरी चिंचवड *अ. भा. ब्राह्मण महासंघातर्फे मतदार जागृती मोहीम

*अ. भा. ब्राह्मण महासंघातर्फे मतदार जागृती मोहीम

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

चिंचवड प्रतिनिधी

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचा संकल्प करण्यात आला असून त्यासाठी मतदार जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क आहे. तरीदेखील अनेक मतदार मतदानाबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. प्रत्येकाने हक्क नव्हे तर कर्तव्य म्हणून मतदान केले पाहिजे. यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राज्यभर उमेदवार व मतदारांना प्रत्यक्ष भेटून तसेच समाज माध्यमांतून मतदानाबाबत जनजागृती करीत आहेत. डॉ. गोविंदजी कुलकर्णी यांनी चिंचवडे विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांची भेट घेऊन त्यांना या मोहिमेविषयी माहिती दिली. शंकर जगताप यांनी त्यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास त्यांनी जगताप यांना दिला.

banner

महासंघाच्या या जनजागृतीमुळे मतदानाचा टक्का वाढून चांगले उमेदवार निवडून येतील, असा विश्वास डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?