पिंपरी दिनांक (१४ मार्च २०२५) जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह संत तुकाराम महाराज गाथा पारायण सामुदायिक सोहळा संपन्न होत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी पहाटे पाच वाजता काकड आरती, गाथा पारायण, हरिपाठ,असे विविध कार्यक्रमाचे या ठिकाणी करण्यात येत आहे अनेक भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.

{“
किर्तनकार हरिभक्त श्री नितीन महाराज काकडे, हरिभक्त श्री अशोक महाराज इदगे, ह भ प श्री उमेश महाराज दशरथे, यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली. असून या पुढील कीर्तन रुपी सेवा देण्याकरिता ह भ प श्री महादेव महाराज राऊत ह भ प श्री रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, ह भ प श्री अनिल महाराज पाटील, ह भ प श्री आसाराम महाराज बडे आसाराम महाराज बडे, गुरुवर्य ह भ प श्री पंढरीनाथ (नाना) महाराज तावरे यांचे कीर्तन रुपी सेवा देण्याचे आयोजन आहे. तसेच दिनांक १९/३/२०२५ रोजी काल्याचे किर्तन ह भ प श्री उल्हास महाराज सूर्यवंशी यांच्या हस्ते कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे तळवडे गावातील ग्रामस्थ विश्वस्त गावकरी अनेक भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित आहे.